वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १३ – २२ डिसेंबर २०२१ | ||||
संघनायक | बाबर आझम | निकोलस पूरन (ट्वेंटी२०) शई होप (ए.दि.) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद रिझवान (२०३) | ब्रँडन किंग (१११) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद वासिम (८) | ओडियन स्मिथ (४) रोमारियो शेफर्ड (४) | |||
मालिकावीर | मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी डिसेंबर २०२१ दरम्यान पाकिस्तानचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. वेस्ट इंडीजने पाकिस्तानमध्ये डिसेंबर २००६ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. मधील काळात दोन्ही संघांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकमेकांविरुद्ध सामने खेळायचे. सर्व सामने कराची मधील नॅशनल स्टेडियम येथे झाले.
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक दरम्यान वेस्ट इंडीजचा कर्णधार कीरॉन पोलार्डला दुखापत झाल्याने त्याने या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे ट्वेंटी२० मालिकेसाठी निकोलस पूरन आणि एकदिवसीय मालिकेसाठी शई होप या दोघांची वेस्ट इंडीजच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. परंतु वेस्ट इंडीजचे ९ खेळाडू कोरोनासंक्रमित झाल्याने एकदिवसीय मालिका जून २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा दोन्ही क्रिकेट बोर्डांनी १६ डिसेंबर २०२१ रोजी उशीरा केली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
पाकिस्तान २००/६ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १३७ (१९ षटके) |
मोहम्मद रिझवान ७८ (५२) रोमारियो शेफर्ड २/४३ (४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- शामार ब्रुक्स आणि डॉमिनिक ड्रेक्स (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
पाकिस्तान १७२/८ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६३ (२० षटके) |
मोहम्मद रिझवान ३८ (३०) ओडियन स्मिथ २/२४ (३ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
वेस्ट इंडीज २०७/३ (२० षटके) | वि | पाकिस्तान २०८/३ (१८.५ षटके) |
मोहम्मद रिझवान ८७ (४५) ओडियन स्मिथ १/३४ (३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- गुडाकेश मोती (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- विश्वचषक सुपर लीग गुण : TBD.
२रा सामना
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- विश्वचषक सुपर लीग गुण : TBD.
३रा सामना
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- विश्वचषक सुपर लीग गुण : TBD.