वेशभूषाकार
चित्रपटातील अथवा नाटकातील पात्रांच्या वेशभूषा (कपडे) ठरविणाऱ्या व्यक्तिला वेशभूषाकार म्हणले जाते. चित्रपट अथवा नाटकाचा काळ, पार्श्वभूमी, कलाकाराची भूमिका या सर्वांना लक्षात घेऊन वेशभूषाकार पात्रांसाठी कपडे ठरवितो. वेशभूषा नाटकात फार महत्वाची असते. वेशभूषा केल्याने कलाकार उठून दिसतो.