Jump to content

वेदोत्तेजक सभा

भारतीय विद्यांची अध्ययन परंपरा जतन व्हावी यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात ३१ ऑगस्ट १८७५ रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभेची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी तत्कालीन वैदिक, शास्त्री, पंडित व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली होती.

वेदोत्तेजक संस्थेतर्फे वेदाध्ययनास व न्याय, मीमांसा, वेदान्त, व्याकरण, साहित्यशास्त्र, काव्य इत्यादींच्या अभ्यासास उत्तेजन देण्यासाठी परीक्षाही घेण्यात येते. वेद पठणानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिज्ञ, कोविद, चूडामणी या अनुक्रमे बारावी, बी.ए., एम.ए.च्या समकक्ष पदव्या देण्यात येतात. कर्मकांडावर मौखिक सोबतच प्रात्यक्षिक परीक्षा असते.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदांचे अध्ययन करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रसंपन्‍न ही पदवी मिळते.

२०१५ साली ऑक्टोबर महिन्यात या परीक्षेसाठी भारतभरातून सुमारे पाचशे विद्यार्थी पुण्यात आले आहेत.