Jump to content

वृक्ष तिरचिमणी

वृक्ष तिरचिमणी

वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:European Tree Pipit; हिंदी:चचडी, मुसारिची ) हा एक पक्षी आहे.

वरील भागाचा वर्ण तपकिरी असून छातीवरील रेषा सुस्पष्ट दिसतात. भुवया, पंखांवरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पांढुरका. ना-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

हिमालयाच्या पायथ्यापासून, भारतीय द्वीपकल्प, पूर्वेकडे बांगलादेशातील ब्रह्मपुत्रा नदी, पश्चिमेकडे सिंध व दक्षिणेकडे नीलगिरी पर्वत, तसेच मालदीव बेटे या भागांत हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

शेतीचा प्रदेश, पिकांच्या कापणीनंतरची रिकामी राने, आणि विरळ झाडे असलेली माळराने.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली