Jump to content

वीणा सानेकर

प्रा. डॉ. वीणा सानेकर या मराठी लेखिका आहेत. त्या मराठी अभ्यास केंद्राअंतर्गत असलेल्या मराठी शाळा या गटाच्या प्रमुख आहेत. मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणारे वीणाताईंचे लेख प्रामुख्याने मराठी भाषा, तिचे जतन आणि संवर्धन या विषयांवरचे असतात.

८ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने लढा मराठी शाळांचा ही महाराष्ट्र-राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकूणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी भारतीय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ३ मे २०११ रोजी झालेल्या मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली होती.

मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’मानकरकाका’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत. तसेच सुप्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास त्यांनी आपल्या पी.एच.डी.च्या प्रबंधातून मांडला आहे.

पुस्तके

  • आरसपानी जगताना (ललित)
  • गट्टी कवितेशी (बालवाङ्‌मय)
  • मानकरकाका कॅनव्हासपलीकडचा माणूस (संपादन)
  • लढा मराठी शाळांचा
  • कथनात्मक साहित्यः स्वरूप, संकल्पना आणि प्रवास
  • शिक्षणाचे मराठी माध्यमः अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान (सहसंपादन)

संदर्भ

मराठीच्या जतन-संवर्धनाचा खेळ Archived 2017-01-08 at the Wayback Machine.