Jump to content

वीजवहन जाळे

विद्युत नेटवर्कचे सामान्य लेआउट.

वीज_वहन_जाळे (विद्युत ग्रिड) हे उत्पादकांकडून ग्राहकांना वीज वितरित करण्यासाठी एक परस्पर जोडलेले नेटवर्क असते. ह्यात वीज निर्मिती करणारे (उत्पादन केंद्र) हे मागणी केंद्राकडे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन्सने वीज आणतात. वैयक्तिक ग्राहकांना ही वीज वायरी वापरून वितरित करतात.

पॉवर स्टेशने ही इंधन स्रोताजवळ, धरणांजवळ किंवा सोलरसारख्या आधुनिक ऊर्जा स्रोतांजवळ असतात. पॉवर स्टेशने आकाराने फार मोठी असल्याने बहुधा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांपासून लांब असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्याचा फायदा मिळतो. विजेची निर्मिती केल्यावर ती स्टेप अप करून इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशनला जोडली जाते.