वी वेअर मेकिंग हिस्ट्री : लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स मुव्हमेंट
वी वेर मेकिंग हिस्ट्री : लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स स्ट्रगल[१] ललिता के. वसंता कन्नबिरन, रमा मेलकोट, उमा माहेश्वरी, सूझी तारू,वीणा शत्रुघ्न, स्त्री शक्ती संघटना संपादित 'वी वेर मेकिंग हिस्ट्री : लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स स्ट्रगल ' हे पुस्तक भारतामध्ये नवी दिल्लीतील काली फॉर विमेनने व लंडनमधील झेड बुक्स या प्रेसने १९८९ मध्ये प्रकाशित केले.
प्रस्तावना
या पुस्तकातून तेलंगणच्या सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी झालेल्या स्त्रियांची जीवन कथने व त्यांचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न स्त्री शक्ती संघटनेने केला आहे. स्त्री शक्ती संघटना ही हैदराबाद राज्यामध्ये समूहाने काम करणाऱ्या स्त्रियांची संघटना आहे. या संघटनेचे कार्यकर्ते विशेषतः नागरी भागातील स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या वेगवेगळ्या मोहिमा, त्यासाठी लागणारी कायदेशीर मदत,समुपदेशन वगैरे कामे करते.
१९४८ ते १९५१ या काळामधील हैदराबाद राज्यातील कुप्रसिद्ध रझाकार आणि सरंजामी जमीनदार यांच्या विरोधात स्त्रिया आणि पुरुष यांनी केलेला दंतकथात्मक वाटणारा लढा म्हणजे तेलंगण सशस्त्र लढा. कम्युनिस्ट पक्षाच्या साहाय्याने गरीब आणि मध्यम वर्गातल्या भूमिहीन शेतकऱ्यांनी वेठबिगारी पद्धत आणि बेसुमार कर याविरोधात आवाज उठविला. अनेक लेखनामध्ये ह्या संघर्षादरम्यान झालेल्या काही घटनांच्या नोंदी असल्या तरी कोणीच या लढ्यात सहभागी असलेल्या स्त्रियांविषयी व त्यांच्या योगदानाविषयी लिहिलेले नाही, वा त्यांची दखल घेतली नाही. या पुस्तकातून ज्या स्त्रिया तेलंगण सशस्त्र लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होत्या. त्यांची जीवनकथने आणि आकलने 'मुलाखत' तंत्राचा वापर करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सारांश
इतिहासशास्त्र परंपरा (Historiography) संदर्भाबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याविषयीचे समलोचन या संहितेमध्ये मांडलेले आहेत.उदा० इतिहास म्हणजे काय? हा इतिहास जेव्हा स्त्रियांच्या नजरेतून पाहिला जातो तेव्हा स्त्रिया त्याचा अर्थ कसा लावतात? कोणत्या स्त्रिया ज्या या चळवळीत सहभागी होत्या?,त्यांचे या चळवळीमध्ये काय योगदान होते? चळवळीत सहभागी झालेल्या स्त्रियांचे अनुभव काय आहेत? जेव्हा ही चळवळ १९५१ला थांबली त्यानंतर या स्त्रियांचे काय झाले?. आज या स्त्रिया कुठे आहेत ?. अशा स्त्रियांच्या कथनांच्या माध्यमातून स्त्री शक्ती संघटनेने या चळवळीमध्ये अंतर्गत असणाऱ्या प्रश्नांना मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.स्त्रियांचा इतिहास हा नवीन बौद्धिक आणि राजकीय अवकाश व्यापण्याचा स्वीकार करते याविषयी भाष्य केलेले आहे
तेलंगण सशस्त्र लढ्यातील स्त्रियांनी नर्सेस,कुरिअर्स,आयोजक आणि चळवळीला गतिशीलता आणणे यांसारखी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. चळवळीच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना येणाऱ्या काही विश्वासघातकी आणि धोकादायक घटना स्त्रियांनी त्यांच्या कथनातून उघडकीस आणल्या आहेत.
दायनी प्रियंवदा ही एका वरिष्ठ पोलीस ऑफिसरची मुलगी. गावामध्ये तिच्या वडिलांना खूप मनात असे. जेव्हा दायनी प्रियंवदा ही १५ वर्षाची होती तेव्हा ती तिच्या कम्युनिस्ट दिराच्या प्रभावामुळे घर सोडून या बंडखोरीमध्ये सामील झाली. कम्युनिस्ट पक्षासोबत काम करत असताना राजकीय आणि वैयक्तिक असे जे विरोधाभासात्मक जीवन ती जगली होती त्याविषयी दायनी प्रियंवदा तिच्या कथनात सांगत होती. आम्ही दबावाची,तणावाची पर्वा न करता जगायला शिकलो.आणि म्हणूनच जरी मी माझ्या आयुष्यातील बहुमोल असे काही तरी गमावले असले तरी आजही मला पक्षाविषयी आपुलकी वाटते. आता जरी एक व्यक्ती म्हणून माझे जीवन देशोधडीस लागले असेल तरी याला पूर्णपणे पक्ष जबाबदार नाही.आमच्यासाठी सर्वात आधी कम्युनिस्ट होते कारण ते चांगले काम करत होते,त्यानंतर स्त्रियांनी हे समजून घ्यायला सुरुवात केली कि त्या ह्या विस्तीर्ण चळवळीच्या एक भाग आहे.
तेलंगण स्त्रियांची कथने ही जीवन बदलवू शकण्याच्या जाणीवेचा उदय आणि दुःखदायक घटनांच्या दृष्टीला सतत जागृत ठेवणे अशी दोन्ही बाजू मांडणारी आहेत. परंतु हे लक्षात घेतले गेले नाही.आम्ही इतिहास घडवित होतो हे एक उल्लेखनीय कालक्रम वृतांत आहे. ज्यामध्ये अन्यायाविरोधी बंड पुकारणाऱ्या गरीब शेतकरी वर्गाची जाणीव आणि ही क्रांतिकारक प्रक्रिया कशी आहे? याचा शोध घेणारी तसेच कम्युनिस्ट पक्षाकडून होणाऱ्या लिंगभावाचे राजकारण याचा स्त्रियांवर काय परिणाम झाला? या सर्व घटनांच्या नोंदी आहेत.
हे पुस्तक फक्त स्त्रियांच्या वीरतेचा भूतकाळाबद्द्लच नाही तर आजच्या स्त्रीवाद आणि समाजवादाच्या कोंडीबाबत मांडणी करणारे आहे.
संदर्भ सूची
- ^ Stree Shakti Sanghatana,We Were Making History: Life Stories Of Women In The Telangana People’s Struggle, Kali for women,New Delhi,1989.
.