विसरवाडी
?विसरवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नवापूर |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
विसरवाडी हे महाराष्ट्र राज्यामधील नाशिक विभागातील खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. ते राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेले आहे.
पार्श्वभूमी
विसरवाडी गावाचे नाव गावाचे आराध्य दैवत इसराई माता याच्या वरून ठेवले गेले आहे. विसरवाडी गावाचे सरपंच बकाराम गावित आहेत. येथे आदिवासी,मराठी,मारवाडी,गुजराती आणि मुस्लिम मिश्र समुदाय आहे. येथे वापरली जाणारी सामान्य भाषा आदिवासी आणि मराठी आहे. येथे बहुतांश लोक व्यापारी, शासकीय कर्मचारी आहेत. विसरवाडीला गुरुवारी आठवडे बाजार भरतो. विसरवाडीत विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे मा.श्री.दादासाहेब माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.