विश्वेश्वर हेगडे कागेरी
Member of the Legislative Assembly in Karnataka, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १०, इ.स. १९६१ सिर्सि | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
विश्वेश्वर हेगडे कागेरी (जन्म १० जुलै १९६१) हे भारतीय राजकारणी. २०२४ मध्ये ते उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.[१][२] ते कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते सिर्सिमधून सहा वेळा कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये २००८ ते २०१३ पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री म्हणून काम केले. त्यांनी जून २०१९ ते मे २०२३ या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे २२ वे अध्यक्ष म्हणूनही काम केले.[३]
त्यांनी १९९४, १९९९ आणि २००४ अशा तीन वेळा अंकोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सीमांकन प्रक्रियेनंतर, ते नव्याने तयार झालेल्या सिर्सि मतदारसंघात गेले आणि २००८, २०१३ आणि २०१८ च्या निवडणुकीत त्यांनी जागा जिंकली.[४]
संदर्भ
- ^ "Fifth-list-bjp-candidates-ensuing-general-elections-2024-parliamentary-constituencies". 25 March 2024 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Brief Profile". BJP. रोजी मूळ पानापासून संग्रहित26 October 2009. 8 December 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ "BJP wins 28 out of 33 seats in coastal Karnataka, Malnad". The Hindu. 15 May 2018.