विशाळगड संस्थान
विशाळगड संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान आहे.
संस्थानिक
कोल्हापूर संस्थानचे महाराजे छत्रपती यांचे पंतप्रतिनिधी हे विशाळगड संस्थानाचे संस्थानिक होते. ते औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी यांच्या वंशातील होते. विशाळगडचे संस्थानिक हे मलकापूर या गावात राहत असत.[१]
विशाळगड किल्ला
विशाळगड याचे पूर्वीचे नाव खेळणा होते. या किल्ल्याची बांधणी शिलाहार राजा मारसिंह याने केली. नंतर हा किल्ला बहामनी राजांकडे होता. त्यांच्याकडून तो आदिलशहाकडे आला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. १८४४ पर्यंत या किल्ल्याची व्यवस्था पंतप्रतिनिधी यांकडे होती.