विशाखापट्टणम विषारी वायु दुर्घटना
gas leak incident in Visakhapatnam, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | gas leak (styrene), अपघात, chemical accident | ||
---|---|---|---|
स्थान | R. R. Venkatapuram, Payakaraopeta Mandal, अनकापल्ली जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत | ||
तारीख | मे ७, इ.स. २०२० (21:30, यूटीसी+०५:३०) | ||
मृत्युंची संख्या |
| ||
जखमींची संख्या |
| ||
| |||
विशाखापट्टणम वायुदुर्घटना किव्हा विझग वायुदुर्घटना आर. आर. वेंकटापुरम गावात एलजी पॉलिमर केमिकल प्लांटमध्ये हा एक औद्योगिक अपघात आहे[१][२]. हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या सीमेवर गोपाळपटणम जवळ आहे. ही घटना ७ मे २०२० च्या पहाटे घडली. परिणामी वाष्प ढग सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल)च्या त्रिज्येवर पसरला, ज्यामुळे आसपासच्या भाग आणि खेड्यांचा परिणाम झाला. ८ मे रोजी मृतांची संख्या १३ होती, आणि १०००हून अधिक लोक प्रभावित झाले होते.[३]
प्राथमिक तपासणीनुसार, स्टायरिन गॅस साठवण्याच्या युनिट्सची अयोग्य देखभाल, अयोग्य स्टोरेज आणि ऑपरेशनच्या त्रुटी गळतीचे कारण असल्याचा संशय आहे. आंध्र प्रदेश सरकारने मृतांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची घोषणा केली आहे, आणि पीडित सर्व व्यक्तींसाठी ३० कोटी रुपयांच्या मदत केली आहे.
संदर्भ
- ^ Fri, ऑनलाइन लोकमत on. "Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू". Lokmat. ११ मे २०२० रोजी पाहिले.
- ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल. "विशाखापट्टणममध्ये वायूगळती, चिमुरड्यासह तिघे दगावले, 100 जण रुग्णालयात". TV9 Marathi. ११ मे २०२० रोजी पाहिले.
- ^ "Vizag Gas Leak: NGT ने LG Polymers ला 50 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश, चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत | 🇮🇳 LatestLY मराठी". LatestLY मराठी. ११ मे २०२० रोजी पाहिले.