विशाखापट्टणम विमानतळ
विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ आयएनएस डेगा विमानतळ విశాఖపట్నం విమానాశ్రయము | |||
---|---|---|---|
आहसंवि: VTZ – आप्रविको: VEVZ | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना/सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय नौसेना भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | विशाखापट्टणम | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १५ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 17°43′16″N 083°13′28″E / 17.72111°N 83.22444°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०५/२३ | ६,००० | १८२८.८ | डांबरी धावपट्टी |
१०/२८ | १०,५०० | ३,२०० | डांबरी धावपट्टी |
सांख्यिकी (२००८) | |||
प्रवासी | ६००,०००[१] |
विशाखापट्टणम विमानतळ (आहसंवि: VTZ, आप्रविको: VEVZ) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे असलेला विमानतळ आहे.येथे नौसेनेचे विमानतळ देखील आहे.
ते विशाखापट्टणमया गावापासुन सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.ते आंध्र प्रदेशमधील हैदराबादनंतर दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.त्यावर भारतीय नौसेनेचे नियंत्रण आहे, जी तेथे हवाई वाहतूक नियंत्रण व उड्डाणासाठी नागरी व सेनेच्या विमानांना सहाय्य पुरविते. आधी याची धावपट्टी६,००० फूट (१,८०० मी) लांब होती त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री टी. सुब्बिरामै रेड्डी यांनी १५ जून २००७ रोजी ६० मी (२०० फूट) रुंद व १०,५०० फूट (३,२०० मी) लांबीच्या नवीन धावपट्टीचे उदघाटन केले. इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम[मराठी शब्द सुचवा]च्या उभारणी व आखणीने जुलै २००७पासून या विमानतळात रात्रीच्या भूअवतरणाची सोय झाली.ही सेवा स्पाईसजेटच्या विमानाने उदघाटीत झाली.
विमानसेवा व गंतव्यस्थान
देशांतर्गत सेवा
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया स्थानिक | दिल्ली |
इंडियन एरलाइंस | भुवनेश्वर,चेन्नई,हैदराबाद,मुंबई |
जेटलाईट | चेन्नई,हैदराबाद,मुंबई दिल्ली, कोलकाता |
किंगफिशर एरलाइंस | बंगळूर, चेन्नई,हैदराबाद, तिरुपती |
पॅरामाउंट एरवेझ | बंगळूर,हैदराबाद, |
स्पाईसजेट | दिल्ली,हैदराबाद,मुंबई |
कार्गो[मराठी शब्द सुचवा] सेवा
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
क्रिसेंट एर कार्गो | चेन्नई,कोलकाता |
एक्स्पो एव्हीएशन | कोलंबो |
हेलिकॉप्टर सेवा
सेवा | गंतव्यस्थान |
---|---|
हेलिगो चार्टर्स | समुद्र किनाऱ्याबाहेरचे कार्य |
भविष्यातील योजना
भारतीय विमानतळ प्राधिकरण व सत्यांबा विद्यापिठ या दरम्यान एक सामंजस्य करार झाला आहे.त्यात इंग्लंडची फाल्कन एरलाइंस ही तेथे फ्लाईंग क्लब सुरू करणार आहे.
नवीन टर्मिनल ईमारत
संदर्भ
बाह्य दुवे
- विशाखापट्टणम विमानतळ Archived 2009-05-18 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VEVZ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.