Jump to content

विशाखा कमिटी

कामाच्या/व्यवसायाच्या ठिकाणी विशाखा मार्गदर्शक तत्त्व याचे पालन करण्यासाठी, काम देणाऱ्याला विशाखा कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे, कुठल्याही प्रकारचा लैगिक छळ होऊ नये यासाठी कमिटी काम करणे लागते. याला विशाखा समिती असेही म्हणतात. ही समिती जेथे १० किंवा त्यापेक्षा अधिक जण काम करतात अशा ठिकाणी असणे बंधनकारक आहे.

बैठक

या कमिटीची बैठक ३ महिन्यातून एकदा घेणे बंधनकारक आहे. या कमिटीची माहिती सगळ्यांना होण्यासाठी या कमिटीच्या सदस्यांची नावे जाहीर करून, सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. या कमिटीत बहुतेक महिला व प्रातिनिधिक पुरुष असणे गरजेचे आहे, त्या शिवाय नियुक्त केलेली नाही अशी स्वयंसेवी सेवेतील एक महिला अधिकारी या समितीत घेणे बंधनकारक आहे.

सदस्य

या कमिटीत काम करणाऱ्या महिला, व्यवस्थापक महिला व प्रातिनिधिक पुरुष यांची नेमणूक केली जाते. त्याच कमिटीत कामासाठी नियुक्त केलेली नाही अशी बाहेरील स्वयंसेवी संस्थेतील एक या विषयातील तज्ज्ञ महिलाही नेमली जाते. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाची लेखी तक्रार या सदस्यांपैकी कोनाहीकडे केलेली चालते.