Jump to content

विशाखा (नक्षत्र)

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

विशाखा एक नक्षत्र आहे. अठ्ठावीस नक्षत्रांपैकी हे सोळावे नक्षत्र आहे.

हे सुद्धा पहा

भारतीय नक्षत्रमालिकेतील सोळावे नक्षत्र. ‘राधा’ हे याचे दुसरे नाव आहे. याचे पहिले तीन चरण (चतुर्थांश) तूळ राशीत व उरलेला चवथा चरण वृश्चिक राशीत येतो. वृश्चिक राशीतील विंचवाचे तोंड व चित्रा नक्षत्र यांच्यामध्ये हे काहीसे अंधुक नक्षत्र काळजीपूर्वक पाहिल्यास दिसते. काहींच्या मते यात दोन तर काहींच्या मते चार तारे आहेत. वैदिक वाङ्मयात यात दोन तारे असल्याचे उल्लेख आहेत. (पाश्चात्य) तूळ राशीतील आल्फा लिब्री (झुबेन एल गेनुबी) हा या नक्षत्राचा योगतारा (मुख्य तारा) भोग २०१ ° १४'.६ आणि शर ०° २०'.९ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या ठिकाणी असून त्याची ⇨प्रत २.९६ आहे. हा क्रांतिवृत्ताच्या (सूर्याच्या वार्षिक भासमान मार्गाच्या) अगदी जवळ असल्याने क्रांतिवृत्ताचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त आहे. दुर्बिणीतून पाहिल्यास हा तारकायुग्म असल्याचे दिसते. या नक्षत्रातील दुसरा तारा याच्या उत्तरेस असून त्याचे ज्योतिषशास्त्रीय नाव बीटा लिब्री (झुबेन एल शमाली) आहे. तो होरा १५ तास १४.३ मिनिटे आणि क्रांती - ९° १२' [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] येथे दिसतो. बीटा लिब्री हा हिरवट रंगाचा तारा रूपविकारी (ठराविक काळाने तेजस्विता बदलणारा) तारा असून त्याची प्रत २.६२ आहे. मे महिन्याच्या शेवटी हे नक्षत्र रात्री ९ च्या सुमारास याम्योत्तर वृत्तावर येते. तैत्तिरीय ब्राह्मण काळी शरत् संपात बिंदू या नक्षत्रात होता. या नक्षत्राची आकृती तोरण व देवता इंद्राग्नी मानतात. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र त्रिपाद, मिश्र, अधोमुख, अंध व नपुंसक मानले जाते.

                            ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)