विवेकानंद केंद्र
स्थापना
०७ जानेवारी १९७२ (स्वामी विवेकानंद यांच्या १०८व्या जन्मदिनी - तिथीनुसार) कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यासमोर पी.महादेवन यांच्या अध्यक्षतेखाली श्री.एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राविषयी रीतसर प्रस्ताव मांडला. सर्वानुमते तो मंजूर झाला.[१]
मार्गदर्शक तत्त्व
मानवसेवा हीच माधवसेवा [२]
स्वरूप
अध्यात्मप्रेरित संघटना
दुहेरी लक्ष्य
मनुष्य निर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थान
राष्ट्रपुनरुत्थान यासाठी निवडलेली कार्यक्षेत्रे
शिक्षण, योगवर्ग, ग्रामीण विकास, नैसर्गिक संसाधन विकास, प्रकाशन, जन-प्रबोधन
मुख्य कार्यालय
कन्याकुमारी
कार्याचे स्वरूप
०५ वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते जीवनव्रती या नावाने संबोधले जातात. व ते वेतनाविना काम करतात. समाजातर्फे लोकांच्या नियमित योगदानावर आधारित 'परिपोषक योजना' आखण्यात आली आणि त्या आधारे या जीवनव्रतींचा योगक्षेम चालविला जातो. [१]
गुरुकुल पद्धतीने चालणारी ५८ विवेकानंद केंद्र विद्यालये अरुणाचल, आसाम, नागलंड, अंदमान-निकोबार, कर्नाटक, तामिळनाडू येथील दुर्गम भागात शिक्षणाचे कार्य करत आहेत. [२]
अरुणज्योती प्रकल्प
अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठीचा प्रकल्प. [२]
आधारभूत ग्रंथ
- Sadhana of Service (सेवा साधना) - ले. एकनाथ रानडे.
- Rousing Call to Hindu Nation (हिंदू तेजा जाग रे) - ले. एकनाथ रानडे.
- एकनाथजी
- ध्येयमार्गानुयात्रा [१]