विल्हेम्सहाफेन
विल्हेम्सहाफेन Wilhelmshaven | ||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
विल्हेम्सहाफेन | ||
देश | जर्मनी | |
राज्य | नीडर जाक्सन | |
क्षेत्रफळ | १०६.९ चौ. किमी (४१.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २४६ फूट (७५ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ७५,७२८ | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.wilhelmshaven.de/ |
विल्हेम्सहाफेन (जर्मन: Wilhelmshaven) हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक शहर आहे. जर्मनीच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले विल्हेम्सहाफेन जर्मनीचे खोल पाण्यामधील एकमेव बंदर आहे व येथे जर्मन नौसेनेचा सर्वात मोठा तळ स्थित आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान महत्त्वाचे बंदर असलेल्या विल्हेम्सहाफेनवर दोस्त राष्ट्रांच्या वायुसेनेने प्रचंड बॉम्बफेक केली. ज्यात शहराचा बव्हंश भाग नष्ट झाला होता. युद्ध संपत असताना ५ मे, इ.स. १९४५ रोजी पोलंडच्या जनरल स्टानिस्लॉ माचेकने विल्हेम्सहाफेन शहर व तेथील बंदरात असलेल्या क्रीग्समरीनच्या २०० युद्धनौकांना शरणागती दिली होती.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील विल्हेम्सहाफेन पर्यटन गाईड (इंग्रजी)