विल्यम हर्शेल
सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल (१५ नोव्हेंबर, इ.स. १७३८ - २५ ऑगस्ट, इ.स. १८२२) हे खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार होते. युरेनस ग्रहाचा व इतर ग्रहांच्या उपग्रहांचा शोध लावण्याचे श्रेय याच्याकडे जाते. आजही भारतीय ज्योतिषी युरेनससाठी हर्शेल/हर्षेल याच नावाचा उपयोग करतात.