विल्यम चार्ल्स वेल्स
विल्यम चार्लस् वेल्स (जन्मः चार्ल्सटन, नॉर्थ कॅरोलायना राज्य, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) वैद्यक व्यावसायिक आणि निसर्गशास्त्रज्ञ होते. यांनी मानवी त्वचेचा रंग व नैसर्गिक निवडी संबंधी संशोधन व निबंध लेखन केले. तसेच यांनी जीवशास्त्राचेही संशोधन केले.
प्रमुख विचार/संशोधन
- दंव कसे तयार होते, याचे संशोधन केले व उत्तर मिळवले.
- दोन डोळे असूनही एकच प्रतिमा कशी दिसते याचे संशोधन केले व उत्तर मिळवले.
- यांनी रॉयल सोसायटी पुढे शोधनिबंध सादर केला होता. ह्या शोधनिबंधाचं नाव "अकाउंट ऑफ अ फीमेल ऑफ द व्हाईट रेस ऑफ मनकाईंड, पार्ट्स ऑफ हूज स्किन रिझेंबल्स दॅट ऑफ अ निग्रो, वुईथ सम ऑब्झर्वेशन्स ऑन द कॉझेस ऑफ द डिफरन्स इन कलर अँड फॉर्म बिटवीन द व्हाईट अँड निग्रो रेसेस ऑफ मॅन.'
- उत्क्रांतिवाद - नैसर्गिक निवडीचे तत्त्व यावर महत्त्वाचे विचार मांडले.