Jump to content

विल्यम गोल्डिंग

विल्यम गोल्डिंग
विल्यम गोल्डिंग (इ.स. १९८३)
जन्म नाव विल्यम जेराल्ड गोल्डिंग
जन्म १९ सप्टेंबर, इ.स. १९११
मृत्यू १९ जून, इ.स. १९९३ (वय ८१)
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकारकादंबरी, नाटक, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'
पुरस्कारबुकर पुरस्कार (१९८०)
नोबेल पारितोषिक (१९८३)

विल्यम गोल्डिंग (१९ सप्टेंबर, इ.स. १९११ - १९ जून, इ.स. १९९३) हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने त्याचा सन्मान करण्यात आला.[]

शिक्षण

इंग्लंडमध्ये विल्टरशायरमधील ग्रामर स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विल्यम गोल्डिंग याने ऑक्सफर्डच्या ब्रेसनोज महाविद्यालयात एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले.

जीवन

इ.स. १९४० ते इ.स. १९४५ या काळात विल्यम गोल्डिंगने ब्रिटिश नौदलातून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. युद्धापूर्वी एक वर्ष आणि युद्धानंतर सहा वर्षे त्याने शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणूनही काम केले.

लॉर्ड ऑफ द फ्लाईज

गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ही कादंबरी इ.स. १९५४ साली लिहिली. अज्ञातस्थळी जाणारे एक विमान कोसळून एका बेटावर सक्तीने एकत्र राहावे लागलेल्या काही मुलांची कथा त्याने या कादंबरीत मांडली. कादंबरीतील या मुलांच्या वागण्यातून व बोलण्यातून हुकूमशाहीवादी प्रवृत्तींकडून लोकशाहीवाद्यांचा कसा पराभव होत जातो याचे चित्रण 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'मध्ये गोल्डिंगने केलेले आहे.जी.ए.कुलकर्णींनी त्याचे मराठी भाषांतर केले आहे.(१९८७,पॉप्युलर)

लेखन

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Nobel Prize in Literature 1983" (इंग्रजी भाषेत). २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)