विल्यम एटी
विल्यम एटी | |
विल्यम एटी, हिल आणि ॲडमसन द्वारे ऑक्टोबर १८४४ मध्ये घेतलेल्या फोटोवर आधारित स्वयं-पोर्ट्रेट | |
जन्म | मार्च १०, १७८७ यॉर्क, इंग्लंड, युनायटेड किंग्डम |
मृत्यू | नोव्हेंबर १३, १८४९ सेंट ओलेव्ह चर्च, यॉर्क, इंग्लंड, युनायटेड किंग्डम |
राष्ट्रीयत्व | युनायटेड किंग्डम |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | थॉमस लॉरेन्स,रॉयल अकॅडमी |
शैली | वास्तववादी चित्रशैली |
प्रसिद्ध कलाकृती |
|
विल्यम एटी (१० मार्च १७८७ - १३ नोव्हेंबर १८४९) हे एक इंग्रजी चित्रकार होते. ते इतिहास चित्रे आणि नग्न चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. ते पहिले नग्न चित्रशैलीतील ब्रिटिश चित्रकार होते. यॉर्क येथे जन्मलेल्या, एटी यांनी १२ व्या वर्षी हुलमध्ये अप्रेंटीस प्रिंटर होण्यासाठी शालेय शिक्षण सोडले. त्यानंतर सात वर्षांनी त्यांनी लंडनला १८०७ मध्ये त्यांनी रॉयल अकॅडमी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी थॉमस लॉरेन्सच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आणि इतर कलाकारांच्या कामांची नकल करत प्रशिक्षण घेतले. वास्तववादी शैलीतील त्यांच्या क्षमतेमुळे रॉयल अकॅडमीमध्ये त्यांना खूप आदर मिळाला. परंतु लंडनमधील पहिल्या काही वर्षात त्यांना फार कमी व्यावसायिक यश मिळाले.