विलेम बारेंट्स
विलेम बारेंट्स Willem Barentsz (डच) | |
---|---|
जन्म | इ.स. १५५० टर्चेलिंग, सतरा प्रांत |
मृत्यू | २० जून, इ.स. १५९७ समुद्रावर |
राष्ट्रीयत्व | डच |
प्रसिद्ध कामे | आर्क्टिक महासागराचे भ्रमण |
विलेम बारेंट्स (डच: Willem Barentsz; १५५० ते २० जून १५९७) हा एक डच शोधक व खलाशी होता. सोळाव्या शतकामधील अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या सफरींसाठी तो ओळखला जातो. बारेंट्स समुद्राला त्याचेच नाव देण्यात आले आहे.