Jump to content

विलामेट नदी

विलामेट नदी अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील प्रमुख नदी आहे. ३०१ किमी लांबीची ही नदी ओरेगनच्या वायव्य भागात असून ती कोलंबिया नदीची उपनदी आहे.

या नदीचा उगम युजीन शहराच्या दक्षिणेस होते व कॅस्केड पर्वतरांग आणि ओरेगन किनारी पर्वतरांगेच्या मधून ही नदी उत्तरेकडे वाहते आणि पोर्टलंडच्या उत्तरेस कोलंबिया नदीस मिळते.

कॅस्केड पर्वतरांगेच्या अग्निजन्य खडकांची येथे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे झीज होउन ही माती विलामेट नदीच्या खोऱ्यात साठते. यामुळे हे खोरे अतिशय सुपीक आहे.

विलामेट नदी आणि तिच्या उपनद्यांवर २० पेक्षा जास्त धरणे बांधलेली आहेत.