Jump to content

विरोधी पक्षनेता (युनायटेड किंग्डम)

ब्रिटिश सरकारच्या संसदीय परंपरेत विरोधी पक्षाच्या नेत्याला ‘शॅडो प्राईम मिनिस्टर’ असं म्हणतात. कारण, सत्तारूढ़ सरकार कोणत्याही कारणाने म्हणजे पुरेसं संख्याबळ नसताना बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी झाल्यास अर्थात कोसळल्यास देशाची सूत्रे म्हणजेच मंत्रिमंडळाची सूत्रे घेण्यासाठी विरोधी पक्षनेत्याने तयारीत असली पाहिजे. ब्रिटनमध्ये विरोधी पक्षाचा ‘शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ’ही असते.[]

भारताच्या संसदीय परंपरेत विरोधी पक्ष नेते पद हे वैधानिक मानलं जातं आणि पदाची व्याख्या ‘Salaries and Allowances of Leaders of Opposition in Parliament Act, 1977’ भारताच्या संविधानाच्या कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.[]या कायद्यानुसार भारताचे लोकसभा सभापती, संसदेत संख्येने सर्वाधिक खासदार असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला हीच तरतूद राज्य विधिमंडळातही विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देतो.[]

ज्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद हवे आहे त्यांनी नेता निवडून त्याचे नाव सचिवालय आणि सभागृहाचे सभापती यांच्याकडे पाठवावे लागत. या नावावर लोकसभा सभापती किंवा विधानसभा सभापतींकडून विचार केला जातो. म्हणजे वर उल्लेख केलेला संसदेचा संविधान कायदा हा विरोधी पक्षांना त्यांचा नेता निवडण्याचा पूर्ण अधिकार देत आहे. संसदेच्या कामकाजात विरोधी पक्षनेता स्थान अत्यंत महत्त्वाच आणि हे पद सर्व विरोधी गटाचे पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे असते. ते सरकारला प्रतिप्रश्न विचारणारे, लोकांच्या समस्यांसाठी, धोरणांवर अंकुश ठेवणारे, त्यांची निराकरण करणारे, थेट सरकार दरबार मध्ये दाद मागणारे असते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Cabinet Manual" (PDF). gov.uk. ५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "the salary and allowances of leaders of opposition in parliament act, 1977 act" (PDF). भारत सरकार. ५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "महाराष्ट्र राज्य विधानमंडळातील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९७८" (PDF). directorate.marathi.gov.in. ५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.