विराट
द्यूतामधे पराभूत झाल्यावर पांडवांना बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट लागू झाली होती. त्या अटीनुसार एक वर्षाच्या अज्ञातवासाचा काळ पांडवांनी व द्रौपदीने विराट राजाच्या राजवाड्यात व्यतित केला.
कंक असे नाव धारण करून राहाणाऱ्या युधिष्ठिरासमवेत राजा विराट द्युत खेळत असे.
विराट राजाच्या पत्नीचे व राणीचे नाव सुदेष्णा असे होते. या दोघांना उत्तर व उत्तरा अशी दोन अपत्ये होती. यापैकी उत्तरेचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्याशी झाला होता.
विराट राजाचा मेहुणा व सेनापती कीचक याचा वध भिमाने केला होता.