Jump to content

विमेन्स स्टडीज ऑन द एज (पुस्तक)

विमेन्स स्टडीज ऑन द एज[] हे निबंधांचे संकलन असून हे जोन वोलेच स्कॉट यांनी संपादित केले आहे. २००८ साली ड्यूक युनिव्हर्सिटीने ते प्रकाशित केले आहे.

मध्यवर्ती विषय

पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्कॉट विचारतात, ‘स्त्री अभ्यास हे कायदेशीर अभ्यासाचे क्षेत्र कसे होऊ शकते?’ विविध सामाजिक-राजकीय संदर्भ व वेगवेगळ्या राजकीय परिस्थितींमध्ये त्यांच्यासमोर उद्भवणाऱ्या समस्या पुढे आणत निबंधांच्या लेखिका वाचकांना स्त्रीवादाचा प्रवास दाखवतात.

योगदान

संकलित केलेले सर्व निबंध वेंडी ब्राऊन आणि रॉबिन वेगमन यांच्या सहित अन्य प्रसिद्ध स्त्रीवादी लेखक आणि अभ्यासक यांनी लिहिले आहेत.

संदर्भ सूची

  1. ^ ISBN-13: 978-0822342748