विनीता ऐनापुरे
विनीता ऐनापुरे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याजवळच्या निगडी येथे राहतात. त्यांचे एकूण आठ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठीतले प्रसिद्ध नाटक 'कुसुम मनोहर लेले' हे विनीता ऐनापुरे यांच्या 'नराधम' या कादंबरीवर बेतले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला विनीता ऐनापुरे यांच्या कथाकथनाचा एक कार्यक्रम निगडी येथील सावरकर भुवनात २०-५-२०१२ रोजी महाराष्ट्र झाला होता.
पुस्तके
- अज्ञातवासींची बखर (१९८९)
- ऐनापुरी कथा (कथासंग्रह)
- कथा घराघरातल्या
- कथा तिच्या (कथासंग्रह)
- जन्मदा (कादंबरी)
- नराधम (कादंबरी)
- विदेशी कथा
- विधिज्ञ (ॲड. माधवराव वामन जोशी यांचे चरित्र)
- वीणा (कादंबरी) - या कादंबरीला कोमसापचा र.वा. दिघे स्मृती कादंबरी पुरस्कार मिळाला आहे.(२०१२)
- व्याकरण ? अगदीच सोप्पं (इयत्ता ५वी ते १०वी - ६ पुस्तकांची मालिका) (सहलेखिका - शुभदा खळदकर)
- ’संघर्ष एका आईचा - नौदलाशी’ या अनुराधा पळघे यांच्या आत्मनिवेदनाचे शब्दांकन
- सर्वोत्कृष्ट विनीता ऐनापुरे (कथासंग्रह)
- स्त्रीदला (कथासंग्रह)
विनीता ऐनापुरे यांना मिळालेले पुरस्कार
- 'शिक्षण व सहकारमहर्षी बापुरावजी देशमुख कथासंग्रह पुरस्कार' विनीता ऐनापुरे यांच्या ‘स्त्रीदला’ या कथासंग्रहास.