Jump to content

विनायकबुवा पटवर्धन

विनायक पटवर्धन
[[चित्र:|250px]]
विनायकबुवा पटवर्धन
उपाख्य पटवर्धनबुवा
आयुष्य
जन्म इ.स. १८९८ ते इ.स. १९७५
संगीत साधना
गुरू रामकृष्णबुवा वझे
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे ग्वाल्हेर घराणे
संगीत कारकीर्द
कार्य शास्त्रीय गायन

विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा (२२ जुलै, इ.स. १८९८ - २३ ऑगस्ट, इ.स. १९७५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर ह्यांचे ते गुरू होत..

पूर्वायुष्य

पटवर्धनबुवांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज या गावी झाला. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते लाहोर येथे गेले व तिथे त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरपुणे येथे रामकृष्णबुवा वझे यांचेकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला.

सांगीतिक कारकीर्द

पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे, इ.स. १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गांधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले.

ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी 'राग विज्ञान' (सात खंड), 'नाट्य संगीत प्रकाश' आणि 'महाराष्ट्र संगीत प्रकाश' ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार बालगंधर्व यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले.

पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ सोव्हिएत संघ, पोलंडचेकोस्लोव्हाकिया या राष्ट्रांचा दौरा करून आले होते.

पुरस्कार व सन्मान

विनायकरावांना इ.स. १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. इ.स. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बाह्य दुवे