विनयभंग
भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो. कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात. सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो. सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे. तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे. म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.[१]
- भारतीय दंड संहिता कलम ३४९ ते ३५८ विनयभंगाच्या गुन्ह्याशी निगडीत असून सदर विनयभंगाचे प्रकरण घडल्यास या कलमांतर्गत दाद मागता येते.
- तक्रारदार केवळ स्त्री असणे पुरेसे नसून घडलेली घटना ही सदर स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी होती हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे. सदर गुन्हा हा दखलपात्र असून २ वर्षे सक्तमजुरी आणि रू. २००० / -- दंडाची शिक्षा आहे.
- कलम ३४९ : जबरदस्ती
- कलम ३५० : गुन्हा करण्याच्या हेतूने केलेली परवानगीशिवाय जबरदस्ती
- कलम ३५१ : जाणीवपूर्वक केलेले केवळ शाब्दिक नव्हे तर शारीरिक
- कलम ३५२ : नुसार सदर गुन्ह्यांना ३ महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि रू. १००/-- पर्यंत दंड होवू शकतो.
- कलम ३५३ : नुसार सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे
- कलम ३५४ : नुसार एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे.
वरील सर्व गुन्हे हे दखलपात्र, अजामीनपात्र आणि Non Compoundable म्हणजेच कोर्टाबाहेर मिटवता येणार नाहीत असे आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Indian Penal Code". indiankanoon.org. 2020-03-08 रोजी पाहिले.