Jump to content

विधानसभा आणि विधान परिषद

भारतात २८ घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटक राज्यात कायदेमंडळाची निर्मिती केलेली आहे. राज्यघटनेच्या १६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहाचा समावेश केला जाईल एकगृह कायदेमंडळ आणि द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अशा दोन्हीही पद्धती भारतात आढळून येतात. घटक राज्यातील कनिष्ठ गृहाला 'विधानसभा'आणि वरिष्ठ गृहाला 'विधान परिषद' असे म्हणतात. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि तेलंगणा या सहा घटक राज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृही कायदेमंडळ आहे.

हे सुद्धा पहा