विद्रोही कवी
मराठीतील पहिला विद्रोही कवी म्हणून संत तुकारामांचा उल्लेख करावा लागेल. समाजातील वाईट रुढी-परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा कडक शब्दांत समाचार घेऊन तुकारामांनी समाजप्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश दलित कवींचे काव्यलेखन हे विद्रोही काव्य या प्रकारातील आहे. दया पवार, ज वि पवार, प्रल्हाद चेंदवनकर, नामदेव ढसाळ, मल्लिका अमर शेख, प्रज्ञा दया पवार, अशा साहित्यिकांचा उल्लेख विद्रोही साहित्यिक म्हणून करण्यात येतो.तसेच सध्या या काळात विद्रोही लेखन हे नव लेखक ,पत्रकार अल्पेश करकरे (नाफिझ) हे करतात.