Jump to content

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका (mr)
विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका भारतीय आरमाराच्या लढाऊ नौका होत्या. या प्रकारच्या नौका सोव्हिएत युनियनच्या ओसा १ प्रकारच्या नौकांची सुधारित आवृत्ती होती.

भारताकडे अशा एकूण आठ नौका होत्या. जानेवारी १९७१ ते एप्रिल १९७१ दरम्यान या नौका सेवेत दाखल झाल्या. यांपैकी शेवटची नौका आयएनएस विजेता ३ जून, १९९२ रोजी निवृत्त झाली. या आठही नौका भारतीय आरमाराच्या २५व्या घातक क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे भाग होत्या.

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील ऑपरेशन ट्रायडेंट या मोहीमेत यांपैकी तीन नौकांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. आयएनएस वीर, आयएनएस निर्घात आणि आयएनएस निपात या नौकांनी पाकिस्तानी आरमाराच्या विनाशिका आणि सुरूंग पेरणाऱ्या नौका बुडविल्या तसेच पाकिस्तानला रसद नेणारे व्यापारी जहाजही बुडवले होते.

या वर्गातील नौका

नाव ध्वज सेवेत दाखल निवृत्त नोंदी
वीरK82२ एप्रिल, १९७१३१ डिसेंबर, १९८२
विद्युतK83१६ फेब्रुवारी, १९७१३१ मार्च, १९९१
विजेताK84२७ मार्च, १९७१३० जून, १९९२
विनाशK85२० जानेवारी, १९७११५ जानेवारी, १९९०
निपातK86२६ एप्रिल, १९७१२९ फेब्रुवारी, १९८८
नाशकK87१९ मार्च, १९७१३१ डिसेंबर, १९९०
निर्भिकK88२० फेब्रुवारी, १९७१३१ डिसेंबर, १९८६
निर्घातK89२९ जानेवारी, १९७१३१ जुलै, १९८९