Jump to content

विदरबीची वृक्ष तिरचिमणी

विदरबीची वृक्ष तिरचिमणी

विदरबीची वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:Witherby's Tree Pipit; हिंदी:चचडी मुसारिची) हा एक पक्षी आहे.

वरील भागाचा वर्ण तपकिरी असून छातीवरील रेषा सुस्पष्ट दिसतात. भुवया, पंखांवरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पांढुरका. ना-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

गिलगिट, हजारा, काश्मीर, लडाख ते लाहुल या भागांत उन्हाळी पाहुणे. मध्य भारत, दक्षिणेकडे वायव्य आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटकपर्यंत हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

पुरातन वृक्षांच्या राया, पानगळीची विरळ जंगले आणि पडित जमिनी.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली