वित्रुवियस (पूर्ण नाव - मार्क्स वित्रुवियस पॉलिओ) (इटालियन : Marco Vitruvio Pollione) हा एक रोमन वास्तुरचनाकार व अभियंता होता. याने द आर्कीटेक्चुरा हा वास्तुरचनेवर आधारीत दहा खंडांचा ग्रंथ लिहिला. रोमन सम्राट ऑगस्टस याने केलेल्या सहकार्यामुळे वित्रुवियसने हा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता.