Jump to content

विठ्ठल वामन ताम्हणकर

विठ्ठल वामन ताम्हणकर हे जयपूर यथील महाराजांचे महाराजा महाविद्यालयातील इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.(संदर्भ :http://www.archive.org/stream/commonwealthun1914londuoft/commonwealthun1914londuoft_djvu.txt). संयुक्त महाराष्ट्र संकल्पनेची मांडणी करणाऱ्या १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र या पहिल्या ग्रंथाचे ग्रंथ लेखक. (संदर्भ:http://vishesh.maayboli.com/diwali-2009/547)

शिक्षण

B.A. Maths

थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र

१९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले .

ताम्हणकरांच्या संकल्पनेचे महत्त्व लोकशिक्षणचे आणि गीर्वाण लघुकोशाचे संपादक जनार्दन विनायक ओक (मृत्यू २२ एप्रील १९१८) यांना खूपच पटले.जनार्दन विनायक ओक यांनी त्यांच्या लोकशिक्षण नावाचे मासिक (स्थापना १९१२) आणि लोकशिक्षणमाला या नावाची पुस्तकमालेतून ताम्हणकरांनी मांडलेल्या संकल्पनेचा पाठपुरावा वेळोवेळी केला . (संदर्भ:http://vishesh.maayboli.com/diwali-2009/547) आणि (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2969409.cms[permanent dead link])