विठ्ठल राव
पंडित विठ्ठल राव (इ.स. १९२९:हैदराबाद, भारत - ) हे भारतीय शास्त्रीय गायक आहेत. ते हैदराबादच्या शेवटच्या निजामाच्या दरबारातील गझलगायक होते. हैदराबादमधील हिंदी आणि उर्दू शायरांच्या अनेक गझलांचे गायन करून त्यांनी त्या लोकप्रिय केल्या. त्यांच्या प्रसिद्ध शिष्यांमध्ये किरण अहलुवालिया यांचा समावेश होतो.
२९ मे २०१५ रोजी शिर्डीत आलेले पंडित विठ्ठल राव बेपत्ता झाले. तेलंगण राज्याची स्थापनेनिमित्त २ जून २०१५ रोजी त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार होते.
पं. विठ्ठल राव यांनी गायलेल्या काही गझला
- आज उनके दामन पर मेरे अश्क्धलते कैं (कवी सईद शाहिदी)
- एक चमेली के मांडवे तले
- कीस तकल्लुफ कीस आहतें (कवी सईद शाहिदी)
- छाप तिलक (कवी वजाहत भाई)
- तर्के उल्फत का सिला पा भी लिया मैंने (कवी जिगर मुरादाबादी)
- फिर मांग.
- मेरी दास्तां ए हसरत सुनाके रोयें (कवी सईद)
- मैं नही कहतो की वो
- ये है मैकाडा ((कवी जिगर मुरादाबादी)
- हम न भूला सके कभी इश्क के आहते (कवी जिगर मुरादाबादी)