Jump to content

विठ्ठल बापू ठोंबरे

विठ्ठल बापू ठोंबरे[] हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावात राहणारे असून खंडोबाचा संशोधनात्मक अभ्यास करणारे संशोधक आहेत. 'भारतीय लोकदैवत खंडोबाविषयीच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या त्यांच्या संशोधन प्रबंधासाठी ठोंबरे यांना, पुणे विद्यापीठाने 'पीएच.डी.' प्रदान केलेली आहे.[]

शिक्षण

फलटण येथील मुधोजी विद्यालयातून विठ्ठल ठोंबरे यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आईचे व चौदाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ठोंबऱ्यांना मेंढपाळाची कामे करून माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे लागले. नंतर त्यांनी ऑफिसबॉय, स्पॉटबॉय अशी कामे करीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची 'बहिस्थ' पद्धतीने पदवी मिळवली.[]

लेखन

विठ्ठल बापू ठोंबरे यांचा 'कुलदैवत खंडोबा' हा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "मेंढपाळाने केली खंडोबावर डॉक्‍टरेट!". ८ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "खंडोबावरील भक्ती आणि शिक्षणाची जिद्द व चिकाटी, यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेंढपाळ विठ्ठल ठोंबरे यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे". ८ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "मेंढपाळ युवक विठ्ठल ठोंबरे यांच्या खंडोबा शोधप्रबंध साहित्याला डॉक्टरेट". 2013-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ विजयकुमार हरिश्चंद्रे. "भारतीय लोकदैवतावरील संशोधनात्मक ग्रंथ 'कुलदैवत खंडोबा' उपेक्षित". ८ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)