विठ्ठल काटे
विठ्ठल काटे (२२ सप्टेंबर, १९३७) हे पुण्यातील चैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उभारलेल्या चळवळीतून महाराष्ट्रातल्या हास्यक्लबच्या १५० शाखांमध्ये सुमारे १० हजार सभासद आहेत. या संस्थेच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कोपरगांव, नारायणगांव, सातारा, वाई आदी गावांत शाखा आहेत.
सन्मान
- विठ्ठल काटे आणि पत्नी सुमन काटे यांना पुण्याच्या डेक्कन चेंबर ऒफ कॉमर्सचा २०१५ सालचा जीवनगौरव पुरस्कार (२१-९-२०१५)
- पुणे महापालिकेतर्फे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठल काटे आणि त्यांच्या पत्नीचा विशेष सत्कार. (७-८-२०१६)
- एका दूरचित्रवाहिनी काटे यांच्या कार्यावर एक माहितीपट बनवला आहे. २०१७ सालच्या जागतिक हास्यदिनी तो पहिल्यांदा प्रसारित झाला. (७-५-२०१७)