विठे
अहमदनगर जिल्हा विठे | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | अहमदनगर |
जिल्हा उप-विभाग | संगमनेर |
मुख्यालय | अकोले |
लोकसंख्या | 2500 (इ.स. २०११) |
लोकसभा मतदारसंघ | शिर्डी |
विधानसभा मतदारसंघ | अकोले |
पर्जन्यमान | १,२५८ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
विठे (गाव)
विठे हे गाव महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये आहे.
विठे हे निसर्गसंपन्न गाव सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमधून वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले आहे. गावात सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. गावाचे ग्रामदैवत कळंबा माता असून दर वर्षी तिची यात्रा होते. विठे गावात वेगवेगळ्या जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावात गाव सोडून एकूण ४ वाड्या आहेत, ठाकरवाडी, चिंचमाळी, भोजदारी आणि निरगुडेवाडी अशी त्यांची नावे आहेत. ४ वाड्या आणि विठे गावठाण मिळून विठे गाव बनते. गावात ग्रामपंचायत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र विठे
विठे गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सॊय असून १० ते १५ खाटांचा अद्ययावत दवाखाना आहे. ह्या ठिकाणी विठ्यातील आजूबाजूच्या गावांतील रुग्णांना अत्यंत अल्प दरात प्राथमिक आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणार अाली आहे. गरीब गरजू लोकांपर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा अल्प दारात पोहचाव्यात यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारचे कॅम्पांचे आयोजन केले जाते. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्सही उपलब्ध आहे.
प्राथमिक शाळा आणि सावित्रीआई हायस्कूल
विठे गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी सावित्रीआई हायस्कूल आहे. विठे गाव, विठे गावच्या वाड्या तसेच चिंतळवेढे गाव या ठिकाणावरून मुले शिक्षणासाठी येतात.
विठे गावाला कसे पोहचाल?
विठे गावाच्या उत्तरेला दीड किमी अंतरावर निब्रळ हे गाव असून पूर्वेला आंबड आणि रुंभोडी ही गावे आहेत. पश्चिमेला चिंतळवेढा आणि जामगाव आहे तर दक्षिणेला पाडाळणे गाव आहे.
अकोलेपासून विठे १३ किलोमीटरवर आहे, तर राजूर पासून ७ किलोमीटरवर. विठे गाव हे कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर असून, अकोले आणि राजूर ह्या दोन्ही ठिकाणांवरून विठे येथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस आहेत.
विठे : प्रमुख आकर्षण
चोहंडी धबधबा
निसर्गाने भरभरून दिलेल्या विठे गावच्या शिवारात चोहंडी धबधबा आहे. मान्सूनच्या पावसात ह्या धबधब्याला पाणी असते. जवळपास २०० ते २५० फूट उंची असलेला हा धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. जवळ भंडारदरा धरण असल्याने भंडारदराला जाणाऱ्या पर्यटकांसाठी पहिले आकर्षण म्हणजे चोहंडी धबधबा आहे.
विठे घाट
पर्यटकांच्या कुतूहलाचे आणखी एक ठिकाण म्हणजे विठेघाट. कोल्हार-घोटी महामार्गावर असणारा विठे घाट हा निसर्गसौदर्याने नटलेला आहे विविध प्रकारची गर्द झाडी आणि त्यामधून फिरणारे मोर पाहणे म्हणजे पर्यटकांची पर्वणीच. कधी रात्रीच्या वेळी बिबट्या, तरस किंवा वाघोबाचे दर्शनपण होऊ शकते. विविध प्रकारचे प्राणी तसेच पक्षी या परिसरातये सहज पाहायला मिळतात.
प्रवरा नदी
विठे गावचे आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे प्रवरा नदी. प्रवरा नदी विठे गावात उत्तर दिशेला आहे. डोंगरदऱ्यांमधून खळखळाट करत वाहणाऱ्या प्रवरा नदीचा प्रवाह विठे गावात येऊन स्थिरावतो. प्रवरेचा सुंदर असा हिरवागार किनारा आणि एका स्थिर उंचीवर वाहणारे पाणी पाहून सगळ्यांना पोहण्याचा मोह होतो. प्रवरा नदीवर ठाकर लोक मासेमारी करताना नजरेस पडतात.. विठे गावाचे वैभव असलेली प्रवरा नदी पुढे जाऊन नगर जिल्ह्याची जीवनदायिनी बनते.
निळवंडे | निब्रळ गाव | |||
चिंतळवेढा | रुंभोडी | |||
विठे गाव | ||||
पाडाळने | आंबड |