विजयवाडा जंक्शन रेल्वे स्थानक
विजयवाडा విజయవాడ జంక్షన్ पूर्व तटीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | विजयवाडा, आंध्र प्रदेश |
गुणक | 16°31′6″N 80°37′8″E / 16.51833°N 80.61889°E |
मार्ग | हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग विजयवाडा-गुंटकल मार्ग |
फलाट | १० |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८८८ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | BZA |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
विजयवाडा |
विजयवाडा जंक्शन (तेलुगू: విజయవాడ జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नई व दिल्ली-चेन्नई हे देशामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग विजयवाडामध्ये जुळतात. त्यामुळे विजयवाडामध्ये दररोज सुमारे २५० एक्सप्रेस गाड्या थांबतात.
सिकंदराबाद हे जरी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असले तरीही विजयवाडा विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेचा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
भारतामधील हिमसागर एक्सप्रेस व दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ह्या सर्वाधिक अंतर धावणाऱ्या दोन गाड्या विजयवाडामार्गे जातात.