Jump to content

विजयपत सिंघानिया

Vijaypat Singhania (es); বিজয়পত সিংঘানিয়া (bn); Vijaypat Singhania (fr); વિજયપત સિંઘાનિયા (gu); Vijaypat Singhania (ast); Vijaypat Singhania (ca); विजयपत सिंघानिया (mr); Vijaypat Singhania (de); Vijaypat Singhania (ga); Vijaypat Singhania (sl); ヴィジェイパット・シンハニア (ja); ڤيچايپات سينجانيا (arz); വിജയപത് സിങ്കാനിയ (ml); Vijaypat Singhania (nl); विजयपत सिंघानिया (hi); Vijaypat Singhania (en); Vijaypat Singhania (sq); விஜய்பாத் சிங்கானியா (ta) Indiaas ondernemer (nl); chairman emeritus (en); indischer Unternehmer und Ballonfahrer (de); અધ્યક્ષ નીલમણિ (gu); chairman emeritus (en); رائد أعمال هندي (ar); चेयरमैन एमिरिटस (hi); entamador indiu (ast) Vijaypat Singhania (hi)
विजयपत सिंघानिया 
chairman emeritus
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर ४, इ.स. १९३८
कानपूर
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
वडील
  • Kailashpat Singhania
अपत्य
  • Gautam Singhania
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विजयपत सिंघानिया (जन्म:१९३८) हे भारतातील एक व्यावसायिक आणि विमानचालक आहेत. प्रख्यात सिंघानिया कुटुंबातील एक सदस्य असुन, ते १९८० - २००० पासून रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कापड उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहेत. उड्डाण करताना, त्यांनी १९८८ साली हॉट एअर बलूनमध्ये सर्वाधिक उंची मिळवण्याचा जागतिक विक्रम केला आणि लंडन ते दिल्ली २३ दिवसांत उड्डाण करून मायक्रोलाइट सहनशक्तीचा विक्रमही प्रस्थापित केला. त्यांनी त्यांच्या मायक्रोलाइट फ्लाइटची कथा आणि त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे.

भारत सरकारने त्यांना २००१ मध्ये तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि २००६ मध्ये त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल पद्मभूषण पुरस्कार दिले आहेत.[][] याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाने त्यांना १९९४ मध्ये मानद एअर कमोडोर बनवले.[] मुंबईने त्यांना २००६ चे मुंबईचे शेरीफ चा सन्मान दिला.[]

तत्कालीन राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करताना

२०१५ मध्ये, त्यांनी रेमंड ग्रुपमधील त्यांचा संपूर्ण ३७% हिस्सा त्यांच्या धाकट्या मुलाला आणि रेमंडचे तत्कालीन अध्यक्ष गौतम सिंघानिया यांना दिला. या हस्तांतरणाने सिंघानियाच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी एका भांडणास सुरुवात झाली.

सिंघानियाचे वडील एल.के. सिंघानिया हेच सुरुवातीला रेमंड कंपनी चालवत होते. सिंघानिया कुटुंबाने १९४४ मध्ये ईडी ससून अँड कंपनीकडून रेमंड नावाची एक कापड मील खरेदी केली होती. सिंघानिया यांचे चुलत भाऊ गोपाल कृष्ण (जीके) सिंघानिया यांनी १९६९ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर एलके सिंघानिया यांच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेतले. जीके सिंघानिया यांच्या निधनानंतर जानेवारी १९८० मध्ये सिंघानिया अध्यक्ष झाले.[]

रेमंडच्या सुकाणूच्या काळात, त्यांनी कंपनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँड्सपैकी एक बनवले. त्यांच्या कार्यकाळातील सिंघानिया कुटुंबातील कोणत्याही कंपनीपैकी हा सर्वात यशस्वी प्रकल्प होता. त्यांनी रेमंडचा एका मोठ्याऔद्योगिक समूहात विस्तार केला आणि केवळ लोकरीचे कापड उत्पादक कंपनी पासून कृत्रिम कापड, डेनिम, स्टील, फाइल्स आणि सिमेंट इत्यादीचे उत्पादन केले. यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या अखेरीस कंपनीत अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या. तसेच, मंदीमुळे १९९६-९७ मध्ये स्टील आणि सिमेंटचा कंपनीच्या नफ्यात खोलवर परिणाम झाला. यावेळी रेमंडने त्याचे अनेक विभाग विक्रीसाठी ठेवले.[] सप्टेंबर २००० मध्ये, सिंघानिया यांनी रेमंडचे अध्यक्षपद त्यांचा छोटा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवले. गौतम यांनी आपल्या कार्यकाळात कंपनीच्या सिंथेटिक्स, स्टील आणि सिमेंट विभागांची विक्री पूर्ण केली आणि उर्वरित भाग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.[] याकाळात सिंघानिया गैर-कार्यकारी पदावर अध्यक्ष-एमेरिटस म्हणून राहिले.[][]

मार्च २००७ मध्ये त्यांना २०१२ पर्यंत (एन.आर. नारायणमूर्ती नंतर) IIMA च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नामांकन मिळाले. ते यापूर्वी १९९१ ते २००२ पर्यंत आयआयएमएच्या बोर्डावर होते.[१०]

विमानचालन

सिंघानिया हे उत्साही वैमानिक आहेत; २००३ पर्यंत त्यांनी ५००० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव प्राप्त केला होता.[] त्यांनी हॉवर्ड ह्युजेस आणि जे.आर.डी. टाटा यांना विमानचालनातील आपले आदर्श मानले होते.[११]

१९८८ मध्ये, त्यांनी लंडन मधील लंडन बिगगिन हिल विमानतळ ते नवी दिल्ली मधील सफदरजंग विमानतळापर्यंत २३ दिवसांत एकट्याने उड्डाण करून मायक्रोलाइट विमानासाठी वेग-ओव्हर-टाइम सहनशक्तीचा विक्रम प्रस्थापित केला.[१२][१३] पूर्वीचे रेकॉर्ड धारक 'ब्रायन मिल्टन' आणि तत्कालीन राज्यमंत्री 'शीला दीक्षित' यांनी त्यांचे अभिनंदन केले.[१३] सिंघानिया म्हणाले की त्यांच्यासाठी प्रवासाचा सर्वात कठीण भाग म्हणजे भूमध्य समुद्र ओलांडून क्रीट आणि अलेक्झांड्रिया दरम्यान उड्डाण करणे होते. त्यांना समुद्राच्या गहन पाण्याची भीती वाटत असे. यामुळे त्यांनी लाइफ जॅकेट आणि शार्कपासून बचाव करणारे सुरक्षा कवच घालून उड्डाण केले. प्रवासा दरम्यान कंटाळा आला की, ते त्यांच्या दोन वर्षांच्या अनन्या नावाच्या नातीच्या फोटो सोबत गप्पा मारत वेळ काढत असत.[१३][११]

कौटुंबिक कलह

१९९८ मध्ये, सिंघानिया यांनी आपली दोन मुले, मधुपती सिंगानिया आणि गौतम सिंघानिया, जे दोघेही त्यावेळी संचालक मंडळावर होते, यांच्यामध्ये रेमंड ग्रुपचे विभाजन करण्याचे निश्चित केले होते. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात, मधुपती सिंघानिया यांच्यासाठी जेके इंग्लंड आणि रेमंड वूलन मिल्स केन्यासह रेमंडच्या आंतरराष्ट्रीय विभागांवर नियंत्रण ठेवून सिंगापूरला स्थलांतरित करण्याची तात्पुरती योजना होती.[] तथापि, डिसेंबरमध्ये, मधुपती सिंघानिया आणि त्यांची पत्नी अनुराधा यांनी सिंघानिया यांच्यासोबत रेमंडमधील त्यांचे स्टेक, तसेच रिअल इस्टेट होल्डिंग्ससारख्या इतर काही कौटुंबिक मालमत्तांचा त्याग करून एका करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर ते त्यांच्या चार अपत्यासह सिंगापूरला गेले आणि तेथे स्थायिक झाले. त्यांनी सिंघानिया कुटुंबाशी असलेले संबंध कायम स्वरुपी तोडले. मधुपती सिंघानिया यांचे व्यवस्थापन तंत्राबद्दल त्यांच्या वडिलांशी मतभेद होते.[१४][१५] २००७ पर्यंत मधुपती यांनी सिंगापूरचे नागरिकत्व मिळवले आणि तेथे त्यांनी एक सल्लागार कंपनी चालवण्यास सुरुवात केली.[१६]

मधुपती सिंघानिया यांच्या कुटुंबासह विभक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सिंघानिया यांनी अध्यक्ष-एमेरिटस म्हणून राहून, गौतम सिंघानिया यांच्याकडे संपूर्णपणे रेमंड समूहाचे नियंत्रण सोपवले.[] त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये, मधुपती सिंघानियाच्या चार मुलांनी सिंघानिया यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. ज्यात असे म्हणले की त्यांचे पालक आणि सिंघानिया यांनी १९९८ च्या करारात या अपत्यांचे हक्क विचारात घेतले नाहीत. याद्वारे त्यांनी करार रद्द करून रेमंडसह, सोडलेल्या होल्डिंग्समधील त्यांची हिस्सेदारी पुन्हा प्राप्त करायची होती. त्यांच्या सुरुवातीच्या फाइलिंगच्या पाच दिवसांनंतर, सिंघानियाने त्यांचे रेमंडमधील सर्व शेअर्स, सुमारे ₹१००० कोटी किमतीचे ३७.१७% शेअर्स गौतम सिंघानियाकडे हस्तांतरित केले. त्यांच्या नातवंडांनी हे हस्तांतरणथांबवण्यासाठी न्यायालयाद्वारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायाधीशांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.[१५] शेवटी अशा प्रकारे विजयपत सिंघानिया यांनी आपल्या छोट्या मुलाकडे संपूर्ण कारभार हस्तांतरित केला.[१४]

मात्र, लवकरच सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात वाद निर्माण झाला. २००७ मध्ये रेमंडने ब्रीच कँडी येथील जेके हाऊसच्या ३७ मजली मालमत्तेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सिंघानिया त्यावेळी तेथील फ्लॅटमध्ये राहत होते. विकास कराराचा एक भाग म्हणून गौतम यांनी, सिंघानियासह सर्व भाडेकरूंना नूतनीकरणानंतर ₹९००० प्रति चौरस फुट दराने फ्लॅट देण्याचे वचन दिले होते. सिंघानिया नूतनीकरणाची वाट पाहण्यासाठी जुहू येथील कमला कॉटेज या त्यांच्या बालपणीच्या घरी परतले होते.[१४]

नंतर २०१५ मध्ये, मधुपती सिंघानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली की सिंघानिया कमला कॉटेजच्या ताब्यासाठी २००८ च्या लवादाच्या कराराचे पालन करत नाहीयेत. यामुळे सिंघानिया यांनी कमला कॉटेज सोडले आणि ब्रीच कँडीमध्ये एक डुप्लेक्स भाड्याने घेतला. जेके हाऊसचे फ्लॅट एका वर्षांनी तयार झाले. तथापि, त्यांच्यावरील दर वाढून ₹१ लाख प्रति चौ. फूट असे झाले. एकूण सर्व फ्लॅट्सचा विचार करता, कंपनीचे म्हणणे होते की, फरक सुमारे ६५० कोटी चा होत होता. गौतम सिंघानिया यांनी वाढीव दरांनुसार कराराचे पालन करावे की नाही याबाबत बोर्डाशी सल्लामसलत करण्याचे ठरवले आणि त्यांनी तो प्रताव भागधारकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. भागधारकांनी या कराराच्या विरोधात जबरदस्त मतदान केले.[१४]

या सगळ्यामुळे सिंघानिया गौतम सिंघानियावर खूप नाराज झाले. त्यांनी जेके हाऊस फ्लॅटच्या मालकी हक्कासाठी आणि फ्लॅट तयार झाल्यानंतर त्याच्या डुप्लेक्सवर भरलेल्या भाड्याची परतफेड करण्यासाठी दावा केला. त्यांनी करारानुसार गौतम सिंघानिया यांनी हा निर्णय केवळ बोर्डापुढे ठेवला पाहिजे, जो न करता गौतम यांनी त्यांचा जाहीर अपमान केलाय असा आरोप केला. गौतम सिंघानिया यांनी पत्रकारांना सांगितले की, "शेअरहोल्डरचे हित सर्वोपरि आहे आणि ते कौटुंबिक हिताचे स्थान आहे."[१४] सिंघानिया यांनी या उलट गौतम सिंघानियावर आरोप केला की, सिंघानिया यांना करारामध्ये स्वतःसाठी फ्लोअर स्पेस ठेवायची होती, कारण गौतम सिंघानिया जेके हाऊसमध्ये त्यांच्या पगाराचा एक भाग म्हणून आरोग्य फायद्यांचा दावा करत होता आणि कथितपणे अतिरिक्त दावा केला होता.[१७]

२०१७ मध्ये, सिंघानियाच्या खटल्यावरील न्यायाधीशांनी सूचना केली की, कोर्टापुढे खटला सुरू करण्यापूर्वी या दोघांनी कुटुंबातच काही गोष्टीचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.[१७]

२० मार्च २०२४ रोजी गौतम सिंघानिया यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो ट्विटर अकाऊंट वर शेअर करत पिता पुत्रांमधील वाद मिटल्याचे आणि वडिलांचा आशीर्वाद घेतल्याचे म्हणले.[१८]

पुस्तके

सिंघानिया यांनी ॲन एंजेल इन द कॉकपिट हे पुस्तक लिहिले, १९८८ मध्ये त्यांनी यूके ते भारत या मायक्रोलाइट विमानातून केलेल्या प्रवासाचा लेखाजोखा आहे.[११][१९]

२०२१ मध्ये, पॅन मॅकमिलनने त्यांचे आत्मचरित्र ॲन इन कंप्लीट लाईफ प्रकाशित केले.[२०][२१]

संदर्भ

  1. ^ a b "Adventure award for Vijaypat Singhania". The Tribune, India. 20 May 2003. 19 September 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Vijaypat Singhania IIM-A board chairman". The Times of India. 17 December 2005. 2023-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Who is Vijaypat Singhania?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-08-11. 2022-03-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Singhania to be sworn-in as Mumbai Sheriff". The Times of India. 17 December 2005. 2023-07-09 रोजी पाहिले.
  5. ^ Church, Peter (2010). Added Value: The Life Stories of Indian Business Leaders. Roli Books. p. 278. ISBN 9788174367655.
  6. ^ a b Sriram, R. (13 July 1998). "Raymond Group May Be Divided". Business Standard. 2023-07-09 रोजी पाहिले.
  7. ^ a b Zacharia, Reeba; Kurian, Boby (24 September 2011). "I am always on holiday and always on work". The Times of India. 2023-07-09 रोजी पाहिले.
  8. ^ Sundaram, Vasanti (5 March 2004). "Man-To-Man: Going solo". Gulf News. 2023-07-09 रोजी पाहिले.
  9. ^ Bahel, Sunil (17 October 2018). "MVijaypat Singhania sacked as Raymond chairman-emeritus". Mumbai Mirror. 2023-07-09 रोजी पाहिले.
  10. ^ "Fee hike & quota on IIMA table". The Telegraph. 3 March 2007. 2023-07-09 रोजी पाहिले. The board meeting will be chaired by the new chairman of the board of governors, Vijaypath Singhania, who succeeds N.R. Narayana Murthy.
  11. ^ a b c Sharma, Aasheesh (24 October 2005). "Vijaypat Singhania talks about his microlight journey, 'An Angel in the Cockpit'". India Today. 2023-07-09 रोजी पाहिले.
  12. ^ McFarlan, Donald; McWhirter, Norris, eds. (1 October 1991). The Guinness Book of Records 1992 (38 ed.). London: Guinness World Records, Ltd. p. 276. ISBN 9780851123783. Vijaypat Singhania (India) flew from Biggin Hill to Delhi, India, a distance of 8724 km 5420 miles in 87 hr 55 min, from 18 Aug to 10 Sep 1988.
  13. ^ a b c Singh, Ramindar (30 September 1988). "Raymond Woollen Mills chairman Vijaypat Singhania sets record". India Today. 2023-07-10 रोजी पाहिले.
  14. ^ a b c d e Arun, M.G. (28 August 2017). "A bitter suit: Court battle between Vijaypat Singhania, son Gautam shakes up Raymond empire". India Today. 2023-07-12 रोजी पाहिले.
  15. ^ a b Vyas, Maulik (22 August 2015). "Bombay High Court denies interim relief in Singhania family property dispute". The Economic Times. 2023-07-12 रोजी पाहिले.
  16. ^ Lee, Melanie (9 November 2007). "Singapore's economic boom widens income gap". Reuters. 2023-07-12 रोजी पाहिले.
  17. ^ a b Gupta, Saurabh (15 August 2017). "Raymond Man Vijaypat Singhania Has A Message For Parents". NDTV. 17 August 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  18. ^ "Raymond Family: 9 साल के बाद इस अरबपति पिता-बेटे का मिलन, साथ फोटो में दिखे.. क्या लड़ाई खत्म?". आजतक. २१ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ Singh, Jyoti (4 December 2005). "Feat in the air". The Tribune. 2023-07-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. ^ "An Incomplete Life". Pan Macmillan. 31 October 2021. 2023-07-08 रोजी पाहिले.
  21. ^ "Vijaypat Singhania's autobiography is about full life, and many regrets". The Tribune. 9 January 2022. p. 1. 2023-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2023 रोजी पाहिले.