Jump to content

विजय ढवळे

डाॅ. विजय ढवळे मराठी प्रवासवर्णनविषयक पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या मार्मिक या साप्ताहिकात ते जगभरातील गोष्टी हा स्तंभ लिहितात. २०१६ साली शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला त्यावेळी विजय ढवळे यांनी शिवसेनेचा इतिहास एकाचवेळी इंग्लिश, गुजराती, मराठी, हिंदी या चार भाषांत लिहून प्रसिद्ध केला होता.

ढवळे ४०पेक्षा अधिक वर्षे कॅनडात राहत आहेत. ते समाजसेवक, वक्ते व अमेरिकेतील एक यशस्वी उद्योजक आहेत. १९९२ साली लातूरला भूकंप झाला होता तेव्हा त्यांनी कॅनेडियन सरकारकडून ४५ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली होती.

पुस्तके

  • ईमानदारी : यशस्वी उद्योजक डाॅ. नरेश भरडे यांची स्फूर्तिदायक कहाणी-आत्मकथन
  • कलमनामा (राजकीय)
  • कुंपणापलीकडचे विश्व (लेखसंग्रह)
  • दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई
  • न संपणारे आकाश (अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या २५ स्त्री-पुरुषांच्या यशोगाथा)
  • पर्यटनसम्राट (कै. ती. राजाभाऊ पाटील यांची स्फूर्तिदायक जीवनगाथा)
  • मातोश्री विमलाताई ढवळे (व्यक्तिचित्रण)
  • मार्मिकताय नमः
  • लिहिता लिहिता
  • शब्दांच्या फुलवाती (कथासंग्रह)