विजय चोरमारे
विजय चोरमारे हे मराठी पत्रकार आणि कवी आहेत. १९८७ साली दैनिक सकाळ मधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. लोकमत (कोल्हापूर आणि मुंबई) आणि त्यानंतर प्रहार (मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नंतर काम केले. तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे ते निवासी संपादक होते.( ऑगस्ट २०१२ ते फेब्रूवारी २०१५). महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीकडे वरिष्ठ सहाय्यक संपादक (मार्च २०१५ ते मार्च २०२१).[१]
साहित्य
- कवितासंग्रह - पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त
- हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या ‘नष्ट कुछ भी नही होता’ या कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद - काहीच नष्ट होत नसतं - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
- आतबाहेर सर्वत्र या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद - भीतर बाहर सर्वत्र (टिकम शेखावत, बोधि, प्रकाशन जयपूर)
- चरित्रलेखन - देवाशपथ खरं लिहिन (अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचे आत्मचरित्र), मुजरा (शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे आत्मचरित्र) आणि माझी संघर्षयात्रा (प्रा. एन. डी. पाटील यांचे आत्मचरित्र).
- संशोधन - स्त्री सत्तेची पहाट ( पंचायतराज व्यवस्थेतील स्त्रियांच्या कामाचा अभ्यास)
- संपादन - महाराष्ट्राचे राजकारण - नवे संदर्भ, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील परिवर्तन, कर्तृत्त्ववान मराठा स्त्रिया.
- राजकीय - ओल्ड मॅन इन वॉरः शरद पवार
पुरस्कार
- पत्रकारिता-
१) के. के. बिर्ला फाउंडेशन, नवी दिल्ली यांची फेलोशिप, २) पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विकास शिष्यवृत्ती, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ३) सरोजिनी नायडू पुरस्कार (हंगर प्रोजेक्ट, नवी दिल्ली), ४) ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र सरकार, ५) तरवडी (जि. अहमदनगर) येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार इत्यादी.
- साहित्य -
- आतबाहेर सर्वत्र या पुस्तकासाठी -१) इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र सरकार आणि इतर सहा पुरस्कार. शहर मातीच्या शोधात या पुस्तकासाठी - १) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, पुणे, २) बालकवी पुरस्कार, धरणगाव, जि. जळगाव स्त्रीसत्तेची पहाट या पुस्तकासाठी - गुणीजन साहित्य पुरस्कार, औरंगाबाद.
पटना (बिहार) येथील नई धारा नियतकालिकाच्यावतीने नई धारा रचना सन्मान (२०१८) [२]
संदर्भ
- ^ "विजय चोरमारे चोरमारे Blog Post". Maharashtra Times Blog. 2022-01-11 रोजी पाहिले.
- ^ "विजय चोरमारे यांना नई धारा रचना पुरस्कार". Maharashtra Times. 2022-01-11 रोजी पाहिले.