Jump to content

विक्रम संपत

विक्रम संपत
विक्रम संपत (उजवीकडून पहिली व्यक्ती)
जन्म बंगळुरू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रइतिहासकार
प्रसिद्ध साहित्यकृतीसावरकर (पुस्तक)
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार, ए.आर.एस.सी(ARSC) आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो

विक्रम संपत हे लोकप्रिय भारतीय इतिहासकार आहेत, जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि गौहर जान यांच्या चरित्रे लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २०२१ मध्ये, संपतची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

विक्रम संपत यांचा जन्म आणि लहानपण हे बेंगलोरमध्येच गेले, त्यांनी बंगळुरूमध्ये श्री अरबिंदो मेमोरियल स्कूल आणि बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीट्स पिलानी ( BITS Pilani) मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि गणितात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईच्या एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधून फायनान्समध्ये एमबीए केले. संपतने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील स्कूल ऑफ म्युझिकमधून एथनोम्युसिकोलॉजी (ethnomusicology-वांशिक संगीतशास्त्र) मध्ये डॉक्टरेट (ऑक्टोबर २०१७) मिळवली आहे.

कार्य

विक्रम संपत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून काही गौरवशाली ऐतिहासिक पात्रांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. त्यांचे पहिले पुस्तक, स्प्लेंडर्स ऑफ रॉयल मैसूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वोडेयर्स हे म्हैसूरच्या वाडियार राजवंशाचा इतिहास होते. त्यांचे दुसरे काम —माय नेम इज गौहर जान: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशियन— हे ग्रामोफोनवर रेकॉर्ड करणारे भारतातील पहिले शास्त्रीय संगीतकार गौहर जान यांचे चरित्र आहे []. त्यांचे तिसरे पुस्तक - व्हॉईस ऑफ द वीणा: एस. बालचंदर, वीणा उस्ताद डॉ. एस. बालचंदर यांचे जीवनचरित्र आहे. त्यांचे चौथे काम सावरकरांचे दोन भागांमध्ये चरित्र आहे - सावरकर: इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट, १८८३-१९२४ आणि सावरकर: अ कॉन्टेस्टेड लेगसी १९२४-१९६६ []. विक्रम संपत यांनी केलेल्या सावरकरावरील संशाधनामुळे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सावरकराबाबत असलेले बरेच मतभेद दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुरस्कार

त्यांना इंग्रजी साहित्यात साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला होता[]. गौहर जानवरील पुस्तकासाठी न्यू यॉर्कमधील ऐतिहासिक संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ARSC आंतरराष्ट्रीय पुरस्कार.२०२१ मध्ये, संपतची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.

संदर्भ

  1. ^ Ganesh, Deepa (2012-03-05). "It's more than the melody" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ Parashar, Swati (2021-08-28). "'Savarkar: A Contested Legacy, 1924-1966' review: Hindutva's biggest ideologue" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  3. ^ "SAHITYA Akademi - Yuva Puraskar". sahitya-akademi.gov.in. 2021-12-29 रोजी पाहिले.