विक्रम काळे
विक्रम वसंतराव काळे | |
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद | |
विद्यमान | |
पदग्रहण ६ जानेवारी २०१० | |
मतदारसंघ | औरंगाबाद शिक्षक |
---|---|
जन्म | २२ एप्रिल १९७८ पळसप, ता.जि. उस्मानाबाद, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
आई | वसुंधरा काळे |
वडील | वसंतराव काळे |
अपत्ये | निशिगंधा काळे संजना काळे (२ मुली) |
निवास | वसंतविहार, दिपज्योती नगर, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत |
गुरुकुल | कला पदवीधर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ |
व्यवसाय | राजकारणी |
विक्रम वसंतराव काळे हे भारतीय राजकारणी व महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.
वैयक्तिक जीवन
काळे यांचा जन्म महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप या गावी झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी मिळवली.
१९९९ला त्यांनी शुभांगी काळेशी विवाह केला, तसेच निशिगंधा व संजना या दोन मुली आहेत. अनिल काळे हे त्यांचे भाऊ व उषा आणि क्रांती या दोन बहिणी आहेत.
राजकीय कारकीर्द
६ जानेवारी २०१० ते ५ डिसेंबर २०१६ पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले. ८ फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले.