Jump to content

विकासनगर

  ?विकासनगर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरडहाणू
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या१,६३० (२०११)
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषावारली,आगरी, वाडवळी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०१६०२
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

विकासनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर 'साई प्रोव्हिजन आणि जनरल स्टोर्स' नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३७ कुटुंबे राहतात. एकूण १६३० लोकसंख्येपैकी ८०५ पुरुष तर ८२५ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.९१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.०५ आहे तर स्त्री साक्षरता ५४.१४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२८ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.९९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

जांभुगाव,अस्वाळी, खुणावडे, रामपूर, घोलवड, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे, आंबेवाडी, नरपड, ठाकूरवाडी ही जवळपासची गावे आहेत.चिखळे ग्रामपंचायतीमध्ये चिखळे आणि विकासनगर ही गावे येतात.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/