Jump to content

विकास विनायकराव देशमुख

विकास विनायकराव देशमुख
जन्म जानेवारी २५, इ.स. १९८६
करडा ता. रिसोड, जि. वाशीम.
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम. ए.(वृत्तपत्रविद्या आणि जनसंपर्क)
प्रशिक्षणसंस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
पेशा पत्रकारिता
मूळ गावकरडा ता. रिसोड, जि. वाशीम.
पदवी हुद्दा विभागीय प्रतिनिधी
वडील विनायकराव देशमुख
संकेतस्थळ
http://vikasdeshmukhmysite.blogspot.in/

विकास विनायकराव देशमुख हे पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत. ते १ जून २०१३ पासून भास्कर समूहाच्या दिव्य मराठी या दैनिकात वाशीम येथे कार्यरत आहेत.

पत्रकारितेतील योगदान

विकास देशमुखांचे उल्लेखनीय कार्य

  • त्यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये लोकमत अकोला आवृत्तीत ‘पुरोगामी महाराष्ट्रात' या वृत्तमालिकेद्वारे मांगवाडी, ता. रिसोड येथील मांतग समाजाला हनुमान मंदिरात प्रवेश मिळवून दिला. या गावातील मातंग बांधव पिढ्यान्‌पिढ्यांपासून देवदर्शन घेऊ शकत नव्हते. केवळ बातम्यांच्या माध्यमातून प्रबोधन करून विकास देशमुख यांनी त्यांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला.
  • ‘लोकमत मदतीचा हात' या कॉलमद्वारे अनेक शोषितांना, पीडितांना, गरजू विद्यार्थ्यांना व रुग्णांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली.
  • ललित लेखनातून त्यांनी विकास पत्रकारितेचा पायंडा पाडला.

साहित्यक्षेत्रातील योगदान

  • काव्याग्रह या अग्रगण्य वाङ्‌मयीन नियतकालिकाचे संस्थापक सदस्य आणि संपादकीय मंडळ सदस्य.
  • मुक्ताक्षर या वाङ्‌मयीन नियतकालिकाचे कार्यकारी संपादक.

पुरस्कार

  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेबद्दल केलेल्या वस्तुनिष्ठ लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचा सन २००९-१० या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकार (विभागीय) पुरस्कार. स्वरूप १ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ.
  • (अंकुर साहित्य संघाचा) २००८ सालचा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार

संदर्भ

http://www.esakal.com/esakal/20100811/4743972682850088132.htm Archived 2016-03-06 at the Wayback Machine.

http://epaper.esakal.com/eSakal/20091009/4698585855538796520.htm [मृत दुवा]