Jump to content

वि.ह. वझे

डॉ. वि.ह. वझे (?? - डिसेंबर, इ.स. २०१६) हे कोल्हापूरमधील आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करणारे शल्यचिकित्सक होते.

डॉ. वझे हे मूळचे औरंगाबादचे असून त्यांनी मुंबई वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिकूल परिस्थितीत सर्वाधिक गुण मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व आरोग्यसेवेसाठी कोल्हापूरला स्थायिक झाले.

वझे यांनी कोल्हापूरच्या अंबाई हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. ते केवळ नाडी परीक्षेद्वारे रोगाचे अचूक निदान करून अल्प मोबदल्यात रुग्णांवर उपचार ककरीत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात मानद शल्यचिकित्सक पदी असंख्य रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. भारत-पाक, चीन युद्धात जखमी झालेल्या कोल्हापूर परिसरातील वीर जवानांवर त्यांनी मोफत उपचार केले तसेच जवानांच्या कुटुंबीयांचीही मोफत वैद्यकीय सेवा केली. यात त्यांची पत्‍नी मीनाताई वझे यांनी त्यांना साथ दिली

वझे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, गुजराल, देवगौडा, वाजपेयी, नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांचे मानद शल्यचिकित्सक होते.

वझे यांनी कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी मदत केली.

वझे यांना अभिजात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, साहित्यिक चळवळ यांची आवड होती. त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत केली.

पुरस्कार आणि सन्मान

  • १९७३ ते १९७५ या काळात डॉ. वि.ह. वझे हे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते.
  • डॉ. वि.ह वझे हे कोल्हापुरातील न्यू एजुकेशन सोसायटीच्या सी.जी.कुलकर्णी वाङ्मय मंडळाचे २०१६ सालपर्यंत अध्यक्ष होते
  • वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन कोल्हापूर महापालिकेने डॉ. वि.ह. वझे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याची नोंद इंटरनॅशनल टॅलेंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतली होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.