Jump to content

वाहतूक अभियांत्रिकी

वाहतूक अभियांत्रिकी म्हणजे वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करून लोकांची, प्राण्यांची व सामानाची सुरक्षित, कुशलतेने व पूर्ण कार्यक्षमतेने ने-आण करणे आहे. ही स्थापत्य अभियांत्रिकीची उप-शाखा आहे. हिच्यात खालील सहा विभाग आहेत - अवकाश, हवाई, महामार्ग, पाईपलाईन, देशांतर्गत जलमार्ग, समुद्रकिनाऱ्यावरची व सागरावरची वाहतूक). हे विभाग एकूण १८ तांत्रिक विभागांपैकी एक तृतीयांश विभागांचे प्रतिनिधित्व करतात.

रस्त्यांचे नियोजन आणि बांधणी, शहरांचे नियोजन, आणि वाहतूकीचे नियंत्रण करण्याविषयीचा अभ्यास वाहतूक अभियांत्रिकीत केला जातो. देशातील पायाभूत सुविधासाठी या शाखेचे योगदान फार मोठे आहे.