वास्तववाद (आंतरराष्ट्रीय संबंध)
वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासाठी विविध कृतिशील घटकांचा आपापसातील संघर्ष आहे, अशी त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. वास्तववादात मुख्यत्वे तीन विचारधारा आहेत. पारंपारिक वास्तववाद मानवी स्वभावाला केंद्रस्थानी ठेवतो. नववास्तववाद राज्यव्यवस्थेच्या अराजकी रचनेवर भर देतो. नवपारंपारिक वास्तववाद वरील दोहोंच्या एकत्रीकरणावर आधारित आहे. या शिवाय वास्तववादाचे काही स्थानिक प्रकार पण आहेत. राज्यांनी जागतिक राजकारणाला दिशा कोणत्या प्रकारे द्यावी यावरून वास्तववादाचे संरक्षक वास्तववाद[१][१] आणि आक्रमक वास्तववाद[२] असे दोन तट पडतात (बहुतांश वास्तववादी या दोन्ही गटात बसत नाहीत). वास्तववाद्यांचा असा दावा आहे की त्यांच्या विचारधारेतील परंपरांना प्राचीन इतिहासआहे, ज्यात थुसिडिडस, थॉमस हॉब्ज, कौटिल्य आणि निकोलो मॅकीयावेली यांचा समावेश होतो.
मुख्य गृहितके
वास्तववादातील कोणताही विचार मानला अथवा कोणतीही व्याख्या मानली तरी वास्तववादालील सर्व सिद्धांत चार मुख्य तत्त्वांभोवती फिरतात.[३]
१. व्यक्ती किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांपेक्षा राज्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात मुख्य भूमिका बजावतात.
२. आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था अराजकी आहे कारण राज्यांना हुकुम देऊ शकेल अशी राष्ट्रांवरील सत्ता अस्तित्वात नाही.
३. आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेतील कृतिशील घटक विवेकी आहेत कारण ते त्यांच्या स्वहितात वाढ करण्यासाठी कार्य करतात.
४. सर्व राज्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेची गरज असते.
संदर्भ
- ^ Waltz, Kenneth N. (2010-01-26). Theory of International Politics (इंग्रजी भाषेत). Waveland Press. ISBN 9781478610533.
- ^ Toft, Peter (2005-12-01). "John J. Mearsheimer: an offensive realist between geopolitics and power". Journal of International Relations and Development (इंग्रजी भाषेत). 8 (4): 381–408. doi:10.1057/palgrave.jird.1800065. ISSN 1408-6980.
- ^ The Oxford Handbook of International Relations. Oxford Handbooks. Oxford, New York: Oxford University Press. 2010-08-13. ISBN 9780199585588.