Jump to content

वाळुज

  ?वाळुज

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमोहोळ
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४१३२२२
• एमएच/१३

वाळुज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.

हे गाव मोहोळपासून २२ किमी अंतरावर आह़े या गावात जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळ येथून वैरागला जाणाऱ्या मार्गाकडे वळावे लागत़े. काळ्यामातीच्या सुपीक जमिनी असेलेले हे गाव एके काळी अतिशय समृद्ध असल्याच्या खुणा गावाच्या परिसरात पहायला मिळतात़. गावात प्रवेश करताच टोलंजंग दगडी वाडे एका पंगतीत बसवल्याचा भास होतो़. प्रत्येक वाड्याला ढेळजा, कमानीचे उंच दरवाजे व जयविजय उभे असेलले शेंडे पाहायला मिळतात. वाड्यांमधून लोक एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. अनेक घरे दुमजली आहेत. शिवाय एक मजली धाब्याची घरेही गावभर दिसतात़.

ऐतिहासिक स्थळे

महादेव मंदिर - वाळूज येथे महादेवाचे हेमाडपंथी प्राचीन मंदिर असून मंदिराच्या प्रवेशद्वारातच महाकाय दगडी गणपती व नंदी आह़े, वाळकेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जात़े. याच मंदिराशेजारी सिद्धपुरुष संत रामभाऊ महाराज यांची समाधी आह़े. वाळूज येथे भोगावती व नागझरी नद्यांचा संगम असून या संगमावर एक महादेवाचे प्राचीन मंदिर भग्नावस्थेत आह़े. देगाव रस्त्यावर वाळूजपासून दोन कि़मी़ अंतरावर श्रीहरीस्वामी व राघव स्वामी यांचे एकत्रित मंदिर आह़े. हे काशीक्षेत्रीचे ब्राह्मण तप करण्यासाठी या स्थळी आले होत़े. श्रीहरी हे गुरू तर राघव हे त्यांचे शिष्य होत. श्रीहरी स्वामी यांची समाधी येथे आह़े. दलित वस्तीत धर्मराज नावाच्या एका साधुपुरुषाची समाधी आह़े. तसेच आणखी एका साधुपुरुषाचीही समाधी या मंदिराशेजारीच आह़े

गावातल्या मारुती मंदिराजवळ वीरगळ तसेच सतीचे हात आहेत़. ग्रामदैवत खंडोबा असून गावात खंडोबाची दोन मंदिरे आहेत़. दत्त, विठ्ठल अंबाबाई, यडेश्वरी (येरमाळा ) आदी देव-देवतांची मंदिरेही गावात आहेत. वाळूज गावात नरसिंहाची सर्वात जास्त म्हणजे तीन लहान मंदिरे (घुमट्या) आहेत़.

सामाजिक / राजकीय व्यक्ती

  • कै़. ज्ञानोबा कादे - ज्ञानोबा मुरलीधर कादे तथा कादे दाजी हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होत़े. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दहा वर्षे अध्यक्ष तसेच भूविकास बँकेचे संचालक होत़े.
  • भगवान कुलकर्णी - वाळूज येथील लेखक व नाटककार.
  • शिवाजी कादे - हे छायाचित्रकार आहेत. काही मराठी चित्रपटात त्यांना सहअभिनेता म्हणून काम केले आह़े मराठी चित्रपटांची स्थिर चित्रीकरणेही त्यांनी केली आह़ेत.

जवळपासची गावे

  • वाळूज गावाच्या शेजारीच ४ किमी अंतराव देगाव हे गाव आहे. ते मोहोळपासून १८ किमी दूर असून येथे नागनाथाचे प्रसिद्ध मंदिर व महंत श्री शिपलागिरीजी महाराज यांचा मठ आह़े. या गावाला चांगला सामाजिक व सांस्कृतिक वारसा आह़े. मोहोळ व वडवळ येथील सिद्ध नागेशांच्या तथा नागेश संप्रदायाचे एक महत्त्वाचे मंदिर देगाव येथे आह़े येथे कुंभमेळ्याच्या आखाड्यातील प्रसिद्ध शिपलागिरी महाराजांचा मठ आह़े.
  • मोहोळ नरखेड परिसरात नागेश संप्रदायाच्या अनेक पाऊलखुणा आहेत़. या परिसरातल्या आष्टी येथे पेशवाईची लढाई झालेली आह़े. या ठिकाणी पेशव्याचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांची समाधी आह़े.
  • करमाळा येथे एक प्राचीन विहीर असून तिच्या संबंधात जगाच्या केंद्र बिंदूबद्दल अनेक काल्पनिक कथा सांगितल्या जातात़.
  • बार्शी येथ उत्तरेश्वर मंदिराशेजारी संत नामदेवांना विसोबा खेचरांनी गुरू-उपदेश केल्याचे स्थळ आह़े.
  • नान्नज (ता़. उत्तर सोलापूर) येथील प्रसिद्ध माळढोक अभयारण्य वाळूज गावापासून जवळच आह़े.

भौगोलिक स्थान

सोलापूर जिल्ह्यात पुर्वी निजामशाहीत असणारे व मुक्तापुर स्वराज्याच्या जेल चे ठिकाण असलेले व सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चार तालुक्याच्या सीमेवर असलेल, दोन नद्यांचा संगम असलले एकमेव गाव वाळुज आहे.

वाळूज गावांमध्ये भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम आहे. संगमावर महादेवच मंदिर आजही आहे.

१).

वाळूज गाव सध्या मोह़ळ तालुक्यात परंतु मोहोळ तालुक्याच्या उत्तरेकडे शेवटचं गाव म्हणजेच मोहोळच्या सीमेवर आह

२) वाळूज गावाच्या उत्तरेस बार्शी चा सिमेवरच मुंगशी (आर) हे गाव आहे.

३). वाळूज गावाच्या पुर्वेस उत्तर सोलापूर सिमेवरच भागाईवाडी हे गाव आहे.

४) तर वाळूज गावाच्या पश्चिमेला माढा तालुक्यातील धानोरे , बुद्रुकवाडी ही गावे आहेत.

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate